शेतकऱ्यांनी केला ठिय्या 

Farmers' agitation
Farmers' agitation
Updated on: 

नगर तालुका : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत 2018-19च्या कर्जदार सभासद शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळावा, या मागणीसाठी राहाता तालुक्‍यातील अकरा शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य शाखेत ठिय्या आंदोलन केले. 

अजित जोशी, सदाशिव मोहिते, सुमीत आहेर आदींसह अकरा शेतकऱ्यांना आठ लाख रुपयांचा फळपीक विमा मंजूर झाला. याचे पत्र विमा कंपनीकडून देण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम वर्ग होत नव्हती. यासाठी वारंवार शेतकऱ्यांनी बॅंकेशी पत्रव्यवहार केला. मात्र, बॅंकेने दाद दिली नाही. मुदतीत विमा रक्कम खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी आज (गुरुवार) बॅंकेत ठिय्या आंदोलन केले. बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना निवेदन दिले. 

तांत्रिक चुकीमुळे शेतकऱ्यांचे नाव वाकोडी पुणतांबे सर्कल (ता. श्रीरामपूर) असे झाल्याने विम्याबाबत गोंधळ झाला, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. ""नगर तालुक्‍यातील गुंडेगावचाही असाच गोंधळ झाला. गुंडेगावऐवजी गणेगाव झाल्याने येथील शेतकरीही विम्यापासून वंचित आहेत,'' अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिली. शेतकऱ्यांची नावे नोंदवताना गावे, सर्कल अशा चुका झाल्या आहेत. याबाबत केंद्र शासन, राज्य शासन व विमा कंपनी यांनी एकत्रित बसून हा विषय मार्गी लावावा. या विम्याबाबत दोन महिन्यांत पाठपुरावा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे लेखी पत्र जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष गायकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. 

शासनाच्या पोर्टलवरील दोषामुळे अशा चुका होऊ शकतात. मजकुरामध्ये दोष असल्याने हा संभ्रम झाला. या संदर्भात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी केंद्र सरकार, विमा कंपनी व कृषी आयुक्त यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. कृषी आयुक्तांशी चर्चा करून या प्रश्‍नावर मार्ग काढणार आहे. 
- सुधाकर वर्पे, सरव्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Sugarcane Price Protest
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Marathi News Esakal
www.esakal.com