
अंकलखोप : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम मोठ्या उत्साहात व जोमात सुरू झाला आहे. सर्व कारखान्यांनी दैनंदिन ऊसाचे गाळप व उत्पादित साखरेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. मात्र शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिला हप्ता दणक्यात जाहीर केला असून सांगली जिल्ह्यातील कारखाने मात्र अद्यापही आपली भूमिका जाहीर करण्यास तयार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असमाधानाचे वातावरण आहे.