सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या 

तात्या लांडगे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात विशेषत: त्यांच्याच मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुस्ती येथील सूर्यकांत पाटील यांनी चिठ्ठी लिहून 30 जुलै रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे ऊसबिलाच्या थकबाकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

कर्जमाफीचा ऑनलाइन खोळंबा झाला असून बहुतांशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ न मिळाल्याने बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळत नाही. खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे तूर-हरभरा हमीभावाने विकूनही पैसे मिळाले नाहीत व कारखान्यांकडूनही ऊसबिलाची रक्‍कम मिळेना झालीय. काही दिवसांपूर्वी एफआरपी न दिलेल्या काही कारखान्याच्या जप्ती आदेशाला सहकारमंत्र्यांनीच स्थगिती दिली होती. एफआरपी थकबाकीमध्ये सहकारमंत्र्यांशी निगडीत असलेल्या लोकमंगल कारखान्याचाही समावेश आहे. हक्‍काचे पैसेही वेळेवर न मिळाल्याने हताश झालेला बळीराजा आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल उचलत आहे. 

राज्यातील ज्या-ज्या साखर कारखान्यांकडे एफआरपी थकलेली आहे, त्यांना तत्काळ ऊसबिलाची रक्‍कम शेतकऱ्यांना देण्याचा आग्रह करतोय. परंतु, साखरेचे दर कमी झाल्याने त्यांच्याकडून विलंब लागतोय. आता राज्य सरकार त्यावर उपाय शोधत असून त्याबाबत बुधवार, 8 ऑगस्ट रोजी बैठक घेतली जाणार आहे. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

आकडे बोलतात... 
एफआरपीची थकबाकी  2011 ते 2017 
35 साखर कारखाने  2425.77 कोटी 

2017-18 
63 साखर कारखाने  - 761.37 कोटी 
एकूण थकीत रक्‍कम  - 3274.08 कोटी 
अंदाजित शेतकरी  - 23.17 लाख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers committed suicide note written by state Co-Operation Minister