सांगली : ‘शक्तिपीठ’बाधित (Shaktipeeth Highway) १२ जिल्ह्यांतील सर्व शेतकरी, तसेच सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती दिल्या आहेत. त्याला एक वर्ष उलटून गेले तरीही एकाही शेतकऱ्याच्या हरकतीवर सुनावणीही झालेली नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शासनाने तातडीने हरकतींवर सुनावणी घ्यावी, दडपशाही कराल, तर वावरात छत्रपतींचा भगवा झेंडा रोवून आम्ही तयारच आहोत,’ असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या (Farmers Committee) बैठकीत देण्यात आला.