शेतकरी पेन्शनसाठी रस्त्यावरील लढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

आटपाडी : शेतकरी पेन्शनसाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणे घेऊन रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज राहावे, असे आव्हान आमदार रामहरी रुपनवर यांनी येथे केले. साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 2 हजार पेन्शनसाठी येथे तालुका जनता दलाने मोर्चा आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे अध्यक्ष आमदार रुपनवर होते. यावेळी आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील, सरटंच स्वाती सागर, जनतादलाचे तालुकाध्यक्ष आबासो सागर उपस्थित होते.

आमदार रुपनवर म्हणाल, 'शेतकरी पेन्शन साठी जेवढी रस्त्यावरील लढाई तीव्र कराल तेवढे मागणीला बळ मिळणार आहे. शासनाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पेन्शन देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील नऊ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील साठ वर्षावरील शेतकऱ्यांच्या पेन्शन सुरू करावी. यासाठी तातडीने अधिवेशन बोलावून निर्णय घ्यावा अन्यथा पुढचा संघर्ष रस्त्यावर होईल'. 

माजी सरपंच शिवाजीराव पाटील, डी एम पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्याला अॅड. धनंजय पाटील, माणिक पांढरे, बजरंग पाटील, आनंदा हेगडे, शिवाजी येळे, बजरंग गटगुळे, मारुती सरगर, आप्पासो सरगर, दामू सरगर, मारुती सरगर, आदी उपस्थित होते.                

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers fight for pensions