esakal | शेतकरी सन्मानच्या ४.६५ लाखापैकी १.२७ लाखांना शेवटचा हप्ता
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

शेतकरी सन्मानच्या ४.६५ लाखापैकी १.२७ लाखांना शेवटचा हप्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतकरी (farmer) सन्मान योजनेंतर्गत दरमहा पाचशे रुपये मानधन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्याने संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. केंद्र शासन नववा हप्ता जमा मोठा गाजावाजा गेली महिनाभर केल्याचे सांगितले जाते आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असता, जिल्ह्यातील पात्र ४ लाख ६५ हजार ३१६ शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख २७ हजार २०० शेतकऱ्यांना नवन्या हप्ताचे रक्कम बॅंक खात्यावर जमा झालेले आहेत.

केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजनेचा मोठा गाजावाजा करीत योजना सुरु केली. गेली तीन महिने जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचीही नव्याने नोंदणी होत नसल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार ३१६ शेतकरी पात्र आहेत. यापैकी योजनेचा पहिला हप्ता ४ लाख ३१ हजार ७१ जणांना मिळाला आहे. मंजुर शेतकऱ्यांच्या तुलनेत ९२.६४ जणांना पहिला हप्ता मिळाला आहे. दुसरा हप्ता ४ लाख २२ हजार ६२०, तिसरा हप्ता ४ लाख ३८ हजार २९४ शेतकऱ्यांना मिळाला आहे. चौथा हप्ता ३ लाख ८८ हजार ६४० शेतकऱ्यांना, पाचवा हप्ता ३ लाख ९५ हजार ८०४, सहावा हप्ता ३ लाख ६९ हजार ७५८, सातवा हप्ता २ लाख ८५ हजार २५२ तर आठवा हप्ता २ लाख ७० हजार ६५२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेला आहे. शेवटचा हप्ता केवळ १ लाख २७ हजार २०० शेतकऱ्यांना मिळाला आहे. याचा अर्थ केवळ ... टक्के शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे.

हेही वाचा: कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!

तालुकानिहाय लाभार्थी असे- मिरज- ५९ हजार ५६३, कवठेमहांकाळ- ३२ हजार ३२८, तासगाव- ४९ हजार ५५७, जत- ७७ हजार ३९४, पलूस- २७ हजार ४९४, आटपाडी- ३५ हजार १४५, कडेगाव- ३९ हजार ९७५, विटा- ३० हजार २१०, शिराळा- ३९ हजार ७३२ आणि वाळवा तालुक्यातील ७३ हजार ९१८ शेतकरी योजनेस पात्र आहेत.

‘ केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देऊन मोठी मदत दिल्याचा आव आणला जातो आहे. दुसरीकडे शेतमालाची फुकट लुट सुरु आहे. हा निधी न देता भावांतर योजनेसाठी हा निधी राखीव ठेवावा. जेव्हा हमी दर ठरविला जातो, तेव्हा शेतमालाला हमी दर देण्यासाठी हा निधी वापरला तर शेतकऱ्यांना आनंद मिळेल. खऱ्या अर्थांने शेतकऱ्यांचा तो सन्मान असेल.‘

- महेश शिंदे, कवलापूर.

loading image
go to top