esakal | कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!

पोलिस अधिक्षक भवन व जिल्हाधिकारी संकुल या दोन्ही ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवल्याने प्रशासन गंभीर झाल्याचे जाणवले

कणकवलीत बंद खोलीत किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यात खलबत्तं!

sakal_logo
By
तुषार सावंत

सिंधुदुर्गनगरी : भाजप खासदार किरीट सोम्मया (kirit somaiya) आणि आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) हे उपस्थित होते. पोलिस अधिक्षक भवन व जिल्हाधिकारी संकुल या दोन्ही ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवल्याने प्रशासन गंभीर झाल्याचे जाणवले. दोन्ही ठिकाणी पत्रकार व प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींना रोखल्याने या भेटी दरम्यान चर्चा समजू शकली नाही. मात्र भाजपाचा (BJP) पोलिस आणि महसुल प्रशासनाने धसका घेतल्याचे दिसून आले.

जिल्हा पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी भवनात यावेळी जि.प. चे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जि.प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष संजू परब, विनायक राणे, महिला आघाडी प्रमुख सध्या तेरसे, सभापती अंकुश जाधव, राजू राऊळ मनिष दळवी , बाळू कुबल, राकेश कांदे, साक्षी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: कणकवलीत किरीट सोमैया विरुद्ध शिवसेना आक्रमक

यावेळी सोमय्या म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात झालेला संचयनी घोटाळा प्रकरण व परिवहन मंत्री अनिल परब या विषयात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असून विस्तृत माहिती कणकवली (Kankavli) येथे होणार्‍या पत्रकार परिषदेत देणार आहेत.

पोलिसांनी या भेटीचे गांभीर्य वाढवले

भाजप खासदार किरीट सोमैया आणि आमदार नितेश राणे यांच्या या भेटीचे गांभीर्य पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तामुळे अधिकच वाढवले, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निघुन गेले.

हेही वाचा: अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना'; पहा व्हिडीओ

loading image
go to top