Gaus Shirolekar demands government subsidies for farmers after meeting ministers.
Sakal
पश्चिम महाराष्ट्र
Gaus Shirolkar: शेतकऱ्यांना विविध शासकीय अनुदान द्या: प्रदेश सरचिटणीस गौस शिरोळकर; कृषिमंत्री, अल्पसंख्याक, क्रीडामंत्र्यांची घेतली भेट
Meeting with Agri: मागील काही वर्षांमध्ये शासन निर्णयामुळे सात-बारा पत्रकावरील नावे कमी केल्यामुळे ती जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना अॅग्री स्टिक, पीक विमा, पीक कर्ज, शेतकरी सन्मान निधी योजनेसह कृषी खात्याकडे विविध योजना लाभ घेता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कवठेमहांकाळ: राज्यातील देवस्थान व वक्फ जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टिक, पीक नोंदणी, पीक कर्ज, पीक विम्यासारखे विविध शासकीय अनुदान मिळावे, या मागणीचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस गौस शिरोळकर यांनी मुंबई येथे दिले.