
तासगाव : ‘‘शेतकऱ्यांनी शेती जपली पाहिजे. शेतकऱ्याला पैसे नको, प्रोत्साहन द्या म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. ज्या दिवशी कृषिमंत्रिपदासाठी भांडणे लागतील, त्या वेळी शेतकरी आत्महत्या थांबतील,’’ असे प्रतिपादन अभिनेते दिग्दर्शक-सिनेलेखक प्रवीण तरडे यांनी केले. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी केलेल्या पालिकेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.