मिरज : वसगडे-नांद्रे दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणातील सात मीटर जागेचा मोबदला आणि पाच वर्षांचे भाडे, तसेच लोहमार्गाच्या बाजूने रस्ता बनवून देण्यासाठी ३० बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी वसगडे रेल्वे गेटवर पुणे-कोल्हापूर पॅसेंजर (Pune-Kolhapur Passenger) तब्बल साडेचार तास रोखून धरली. यामुळे सातारा- दादर- पंढरपूर आणि कोयना एक्स्प्रेस यासह तीन एक्स्प्रेस एक ते साडेचार तास उशिरा धावली.