
तासगाव : तासगाव तालुक्यातील बस्तवडे फाटा ते सावळज रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर तिघे जखमी झाल्याची दुर्घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तासगाव पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.