

Police inspecting the accident spot near Islampur bus stand where a two-wheeler was hit, leaving one dead and another critically injured.
Sakal
इस्लामपूर : येथील बस स्थानकासमोर मंगळवारी (ता. १६) रात्री झालेल्या भीषण अपघातात पेठ (ता. वाळवा) येथील एक युवक ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालक मोटारीसह पसार झाला आहे. या अपघातात आकाश चंद्रकांत बाबर (वय २७, पेठ) ठार झाला.