
जत : जत-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुचंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर छोटा टेम्पो व मालवाहू टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर मालवाहू टेम्पोचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (ता. २४) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महंमद कुमसगी (वय २४, रा. कोकटनूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर) व दीपक अर्जुन वडर, (वय २३, रा. पडनूर. ता. इंडी, जि. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दुसऱ्या वाहनातील चालक बसवराज मुंजानी हा गंभीर जखमी झाला आहे.