
सांगली : भटक्या कुत्र्यांचेही अस्तित्व मान्य करत त्यांना वेळेवर खाऊ घालून त्यांच्या चाव्यांपासून परावृत्त करण्याचा अभिनव प्रयोग बंगळूर महानगरपालिकेने (बीबीएमपी) एक महिनाभर राबविला. सांगली शहरातही भटक्या कुत्रांची वाढणारी संख्या, नागरिकांवर होणारा या कुत्र्यांचा हल्ला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेने बंगळूर महानगरपालिकेच्या धर्तीवर असा अभिनव उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे.