या मंदिरात झाला दीपोत्सव.... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पायरीजवळ लावले 10 हजार दिवे 
पंढरपूरात सायंकाळी कार्तिकी अमावस्येनिमित्त विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव महाद्वाराजवळ रांगोळीतून साकारलेले विठ्ठलाचे मनमोहक रूप. सायंकाळी विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव महाद्वाराजवळ रांगोळीतून साकारलेले विठ्ठलाचे मनमोहक रूप आणि त्याभोवती केलेली दिव्यांची आरास. श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरीजवळ सुमारे 10 हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. यानिमित्ताने स्वामींनी रांगोळीच्या साह्याने विठुरायाचे भव्य चित्र रेखाटले होते. 

पंढरपूर (सोलपूर ) : हंपी येथील गोविंदानंद सरस्वती स्वामी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल कार्तिकी अमावस्येच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरी जवळ सुमारे दहा हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. यानिमित्ताने स्वामीजींनी रांगोळीच्या साह्याने विठूरायाचे भव्य चित्र रेखाटले होते. 

हेही वाचा : "राष्ट्रवादी'ची साथ सोडणाऱ्यांना "नो एन्ट्री'! 

दरवर्षी अयोध्या, मथुरा, द्वारका येथे दीपोत्सव 
श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील उर्फ विठ्ठल जोशी यांच्या हस्ते यावेळी पहिला दीप प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांनी पणत्या लावल्या. दीपोत्सवा मुळे श्री संत नामदेव पायरी ते महाद्वार हा परिसर उजळून निघाला होता. गोविंदानंद सरस्वती स्वामी दरवर्षी अयोध्या, मथुरा, द्वारका येथे दीपोत्सव साजरा करत असतात. यंदा प्रथमच त्यांनी पंढरपुरात दीपोत्सव साजरा केला. हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

हेही वाचा : "त्या' विषयी मी योग्य वेळी बोलेन-अजित पवार 

हजारो दिवे आले लावण्यात 
दरवर्षी दिवाळीत शिवभक्त प्रतिष्ठानचे अनिल काका बडवे यांच्या प्रेरणेतून चंद्रभागेच्या तीरावर दीपोत्सव साजरा केला जातो. हजारो पंढरपूरकर नागरिक या दीपोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. लक्ष लक्ष दिव्यांनी चंद्रभागेचा तीर या दीपोत्सवाच्या वेळी उजळून निघत असतो. त्याच प्रमाणे काल प्रथमच कार्तिकी अमावस्येच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिराच्या श्री संत नामदेव पायरी येथे रांगोळीतून विठुराया साकारून त्याभोवती हजारो दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे संत नामदेव पायरी ते महाद्वार हा परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता. गोविंदानंद सरस्वती स्वामी यांनी काल प्रमाणे यापुढे दरवर्षी अशाच प्रकारे दीपोत्सव साजरा करावा अशा भावना अनेक पंढरपूर करांनी यानिमित्ताने व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The festival took place in this temple