यंदाचा निपानीचा ऊरुस रद्दच ; कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

the festival like yatra of nipani cancelled for this year on the reason of corona in nipani belgaum
the festival like yatra of nipani cancelled for this year on the reason of corona in nipani belgaum
Updated on

निपाणी : हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असणाऱ्या येथील हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरूस यंदा कोरोना पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. 26 ते 28 नोव्हेंबर हा उरूस उत्सवाचा काळ असून यावेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व आदेशाचे उल्लंघन न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष जयवंत भाटले व पालिका प्रशासनाने गुरुवारी (12) सायंकाळी बैठकीत दिला. शिवाय शासकीय आदेशाप्रमाणे यंदाची दिवाळीही फटाकेमुक्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नगराध्यक्ष भाटले म्हणाले, 'निपाणीतील उरूस प्रसिध्द असून उत्सवासाठी कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा व अन्य राज्यांतील भाविक, भक्त लाखोंच्या संख्येने येतात. यंदा कोरोनामुळे सरकारी आदेशानुसार उरुस रद्द केला आहे. उरूस काळात दर्गाह परिसरात मिठाई, खेळणी, नारळ-कापूर, हार-तुरे अशी कुठलीही दुकाने थाटली जाणार नाहीत. पाळणे येणार नाहीत, मनोरंजनासह कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनामुळे दिवाळीही फटाकेमुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फटाक्‍यावर खर्च करण्यापेक्षा विधायक उपक्रमांना मदत करावी.' 

आयुक्त महावीर बोरण्णावर म्हणाले, 'दर्गाहमध्ये कमिटीतील मोजक्‍या लोकांकडून नित्य पूजा, धार्मिक विधी होतील. दंडवतासह कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. उरुसावेळी हजारो भाविकांची गर्दी होत असते. सध्या कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वर्तविला जात आहे. शिवाय अनेक दिवसानंतर मंगळवारी (10) दोन रुग्ण आढळले आहेत. जागृतीसाठी ध्वनीक्षेपकाव्दारे जागृती केली जाईल.' पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी उत्सव काळात दर्गाह परिसरावर विशेष लक्ष ठेवले जाणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. उपनगराध्यक्षा नीता बागडे यांनीही मार्गदर्शन केले.  
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com