पंधरा वर्षांनंतर पाटील भावकीत एकी 

नागेश गायकवाड - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

आटपाडी - जि. प. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंधरा वर्षांनंतर आटपाडीत तानाजी पाटील आणि भारत पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाने फूट पडलेली पाटील भावकी आता एकत्र आली आहे. आमदार अनिल बाबर यांची शिवसेना आणि भारत पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यात हातमिळवणी झाली. त्यामुळे आटपाडीचे राजकारण पुन्हा पंधरा वर्षांनंतर जुन्या वळणावर आले आहे. 

सन 2000 मध्ये आमदार अनिल बाबर यांनी तालुक्‍यात देशमुखांच्या विरोधकांची मोळी बांधत स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. यात कै. दुळाजी झिंबल. कै. रामभाऊ पाटील, आनंदराव पाटील, तानाजी पाटील, अण्णासाहेब पत्की, विजयसिंह पाटील, उस्माननबी शेख आदी नेतेमंडळींना एकत्र करून देशमुखांना मोठा शह दिला होता. त्यावेळी बाबर यांनी देशमुखांच्या ताब्यातून आटपाडी ग्रामपंचायत आणि झेडपी गटही काढून घेतला होता. त्यानंतर सरपंच पदावरून वाद सुरू झाला आणि पाटील गटात उभी फूट पडली. त्यावेळी रामभाऊ पाटील सरपंच होते. त्यानंतर देशमुखांच्या मदतीने पुन्हा ग्रामपंचायत ताब्यत ठेवली तर तानाजी पाटील यांचा पराभव करत स्वतः जिल्हा परिषदेत निवडून गेले होते. या काळात त्यांचा जयंत पाटील यांच्याशी संबंध आला आणि त्यांनी तालुक्‍यात स्वतंत्र गट तयार केला. 

गेल्या सात वर्षांत त्यांची स्वाभिमानी आघाडीची स्थापना करून राजकीय वाटचाल सुरू होती. त्यांनी गावोगावी गट तयार केला. गेल्यावेळी तालुकाभर झेडपीची निवडणूक स्वबळावर लढवली होती. दरम्यान, रामभाऊंचे निधन झाले. त्यांची पोकळी अजूनही भरून निघाली नाही. सध्या स्वाभिमानीची धुरा भारत पाटील, आनंदराव पाटील संभाळत आहेत. अखेर झेडपी निवडणुकीच्या निमित्ताने ते एकत्र आले आहेत. सेनेने स्वाभिमानीला आटपाडी झेडपी आणि गणाची जागा दिली आहे. त्यामुळे येथे चुरस वाढली आहे.

Web Title: Fifteen years after the amalgamation Patil family