कोरोनाविरोधात लढा ः साईबाबांची झोळी लोकांसाठी खुली, सरकारला दिली 51 कोटींची मदत 

Fight Against Corona: Saibaba Institute grants 51 crores to government
Fight Against Corona: Saibaba Institute grants 51 crores to government

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानाने मुख्यमंत्री निधीसाठी 51 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 

डोंगरे म्हणाले, ""साईबाबा संस्थानाचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. समितीत जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, सहायक धर्मादाय आयुक्त गीता बनकर, अतिरिक्त विभागीय महसूल आयुक्त दिलीप स्वामी यांचा समावेश आहे.

देशात विविध ठिकाणी आलेल्या आपत्तीच्या काळात साईबाबा संस्थानाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, सध्या बंदोबस्तावरील पोलिसांसाठीही साईबाबा संस्थानाने आज सकाळी बुंदी व चिवड्याची प्रत्येकी तीन हजार, अशी एकूण सहा हजार पाकिटे जिल्हा पोलिस मुख्यालयाकडे रवाना केली.

सध्या साईबाबा संस्थानाच्या भोजनालयातून संस्थानाच्या रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक, तसेच शहरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमासाठी रोज मोफत भोजन दिले जाते. आता ते भिक्षेकऱ्यांनीही दिले जाईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com