खासगी प्रवासी वाहतूकदारांवर का ओढावले आहे आर्थिक संकट वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

लॉकडाऊनपूर्वी चंदगड तालुक्‍यातील अनेक जण खरेदीसाठी खासगी प्रवासी वाहतूकीने बेळगावला येत होते. मात्र, वाहतूकीसाठी दोन्ही बाजूच्या सीमा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.

बेळगावः लॉकडाऊनपूर्वी चंदगड तालुक्‍यातील अनेक जण खरेदीसाठी खासगी प्रवासी वाहतूकीने बेळगावला येत होते. मात्र, वाहतूकीसाठी दोन्ही बाजूच्या सीमा बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आम्ही नियमांचे पालन करण्यास तयार आहोत, मात्र आम्हाला वाहतुकीस परवानगी द्या अशी मागणी चालक, मालकांकडून केली जात आहे. 
कर्नाटकात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा गेल्या दोन महिन्यांपासून बंदच आहेत. यामुळे कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेश बंदी असल्याने खासगी वाहतूकदारंच्या समस्येत वाढ झघली आहे. 

चंदगड तालुक्‍यातील हलकर्णी, शिनोळी आदी भागातील 15 मिनी बस व तुडये भागातील 10 हून अधिक मिनी बस चालक बेळगाववर अवलंबून आहेत. तसेच बेळगाव तालुक्‍यातील 20 हून अधिक मिनी बस चालक या भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. सीमा बंद असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे. मिनी बस चालकांना प्रत्येक वर्षी 32 हजार रुपये इन्शुरन्स व तीन महिन्याला सुमारे 10 हजार रुपये टॅक्‍स भरावा लागतो. दोन महिने बंद असल्याने विनाकारण टॅक्‍स भरावा लागणार आहे यामुळे टॅक्‍समध्ये सूट मिळावी अशी मागणीही खासगी मिनीबस चालकांकडून केली जात आहे. 

लॉकडाउनमुळे त्यांचा लग्नसराईचा हंगामही निघून गेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. 

'टॅक्‍स' मध्ये सूट देणे गरजेचे

वाहने बंद करून दोन महिन्यांपासून आम्ही घरातच आहोत. खासगी वाहने सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतरच नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. विनाकारण तीन महिन्याचा टॅक्‍स भरावा लागणार असल्याने सध्या लॉकडाउनमुळे यामध्ये सूट देणे गरजेची आहे. 
विनोद पाटील, मालक, खासगी मिनी बस 
---------------------------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial crisis has hit private passenger transporters ...