esakal | सांगली : शिराळात गोठ्यास आग; 5 जनावरांचा होरपळून मृ्त्यू

बोलून बातमी शोधा

fire in cow house near shirala sangli five animals dead in fire

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विजविण्यासाठी रात्री परिसरातील पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते.

सांगली : शिराळात गोठ्यास आग; 5 जनावरांचा होरपळून मृ्त्यू

sakal_logo
By
Team eSakal

शिराळा (सांगली) : येथील शिराळा औढी रस्त्यावरील पाडळी हद्दीतील यादव मळ्यातील तात्यासाहेब बाळू भांडवले यांच्या जनावरांच्या गोठ्यास आग लागून ५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये जनावरांचे शेड, पिंजर, शेती औजारे असे मिळून अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत आग विझविणाचे प्रयत्न सुरू होते.

घटनास्थळी असणाऱ्या शेडमध्ये लागलेल्या आगीत २ जातीवंत म्हैशी, १ वासरू, १ खिलार बैल, १ रेडी अशी ५ जनावरे भाजून मृत्युमुखी पडली आहेत. तसेच शेती औजारे, पिंजर, शेड पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विजविण्यासाठी रात्री परिसरातील पाण्याचे टँकर मागविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा - सलग दुसऱ्या वर्षी जोतिबा चैत्र यात्रा रद्द; व्यापारी, दुकानदारांना आर्थिक फटका