
आष्टा : नऊ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी मागणी करूनसुद्धा विद्युत तारांची ओढ काढली नसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आष्ट्यातील शेतकऱ्यांचा अकरा एकर ऊस जळून खाक झाला. उसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या पाईप व संच जळून खाक झाले आहेत. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.