esakal | तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग

तासगाव-सांगली रोडवरील कोल्ड स्टोअरेजला भीषण आग

sakal_logo
By
रविंद्र माने

तासगाव : तासगाव-सांगली (tasgaon-sangli) रस्त्यावरील वासुंबे हद्दीत असलेल्या श्री कृपा ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेजला (cold stoarage) आज पहाटे भीषण आग लागली. याठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आज पहाटे कोल्ड स्टोअरेज मधून धूर येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या अनेकांनी त्या परिसरात धाव घेतली असता, आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी तातडीने तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. स्टोअरेज बंद असल्याने आग नक्की कोणत्या भागात आणि किती लागली आहे, हे समजू शकलेले नाही. स्टोअरेज मध्ये मोठ्या प्रमाणावर बेदाणा असून मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: 'ॲपेक्स' मधील 6 मृत्यूंच्या नोंदीचा घोळ; मृत्यूंची कारणे गुलदस्त्यात

loading image