esakal | ब्रेकिंग ः पारनेरमध्ये पुन्हा गोळीबार...भांडण पहायला थांबला नि...
sakal

बोलून बातमी शोधा

 Firing again in Parner

पारनेरमध्ये  कायदा अणि सुव्यस्था राहीला आहे काय असा सवाल अता तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. एका महिन्यात दोनदा गोळीबार झाला त्याच दरम्यान सुपे येथील शहांजापूर चौकात  एकास गावठी कट्टा विकताना रंगेहात पकडले होते.

ब्रेकिंग ः पारनेरमध्ये पुन्हा गोळीबार...भांडण पहायला थांबला नि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः पारनेर तालुक्यात महिनाभरात दुस-यांदा गोळीबार झाला आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा तालुका हादरला आहे. तालुक्यातील गुन्हेगारीने डोकेवर काढले अाहे. पोलिसांचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याचे सिद्ध झाले आहे. मागील महिन्यात वडझिरे येथे गोळीबारात एक महिलेचा जीव गेला तर आज सकाळी दहा वाजणेच्या सुमारास गुणवरेनजिक शिनगरवाडी रस्त्यावर गोळीबार झाला. 

यात भांडणे करणाराऐवजी भांडण पहाणारा संजय पवार रा. राळेगणथेरपाळ (वय23 ) जखमी झाला आहे. 

या बाबत माहीती  अशी की, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गुणवरे ते शिणगरवाडी रस्त्याच्या कडेला एका ओढ्याजवळ चौघांची भांडणे सुरू होती. त्याच वेळी  राळेगण थेरपाळ येथील संजय पवार हे आपल्या मेव्हण्यास भेटण्यासाठी टाकळी हाजीकडे दुचाकीवरून भेटण्यास निघाले होते.

गावठी कट्ट्यातून झाडली गोळी

त्यांना चौघात भांडण सुरू असल्याचे दिसले. ओढ्याजवळ तो आला असता सहज कोणाची भांडणे चालली आहेत हे पहाण्यासाठी तो आपली दुचाकी सावकाश चालवत होता. त्याच वेळी चौघांची भांडणे हातघाईला आले होते. त्या मुळे त्यातील एकाने त्याच वेळी आपल्या जवळील गावठी कट्यातून एक गोळी झाडली. मात्र, ही गोळी नेमकी भांडणे सुरू असेल्या चौघांपैकी कोणालाच न लागता दुचाकीवरील वाटसरू पवार यांच्या हाताला लागली, त्यात ते जखमी झाले.

गोळी लागताच ते पळाले

पवार यांना गोळी लागताच त्या चौघांनी तेथून पळ काढला. त्या मुळे पोलीसांना अद्याप भांडणकरणारे ते चौघे कोण याचा थांगपत्ता लागला नाही. जखमी पवार यांस  पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवले आहे. तेथे त्याच्या हातातील गोळी चा काही भाग काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

 
पारनेरमध्ये  कायदा अणि सुव्यस्था राहीला आहे काय असा सवाल अता तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. एका महिन्यात दोनदा गोळीबार झाला त्याच दरम्यान सुपे येथील शहांजापूर चौकात  एकास गावठी कट्टा विकताना रंगेहात पकडले होते.

पारनेर तालुक्यात गावठी कट्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. तालुक्यात मोठ्या  संखेने गावठी कट्टे आहेत अशी चर्चा अता तालुक्यात सुरू झाली आहे. 

काहीच माहिती नाही
आम्ही ज्या ठिकाणी गोळीबार झाला तेथे भेट दिली आहे. मात्र तेथे रक्त किंवा गोळी सापडली नाही. तसेच ही जागा पारनेर व शिरूर तालुक्याच्या हद्दीवरची आहे. तसेच ती निर्जऩ आहे. तेथे जवळपास कोणीतीच वस्ती नाही. त्यामुळे नोमकी भंडणे कोणाकोणात झाली याचा थांगपत्ता लागला नाही.जखमी पवार यासही भांडण करणारांची माहीती नाही.

- विजयकुमार बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक पारनेर.

loading image
go to top