तारळी धरणाचे पाचही दरवाजे बंद

यशवंत बेंद्रे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

तारळेसह संपुर्ण विभागात तसेच तारळी धरण क्षेत्रात सुमारे दीड महिना सातत्यपुर्ण अविश्रांत पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. कालच्या दिवसात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत 19 जुलै पासुन धरणातुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग धरणाचे पाचही दरवाजे बंद करून काल दुपारी एक वाजल्यापासुन बंद करण्यात आला आहे. 
 

तारळे (पाटण)- तारळेसह संपुर्ण विभागात तसेच तारळी धरण क्षेत्रात सुमारे दीड महिना सातत्यपुर्ण अविश्रांत पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. कालच्या दिवसात 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गत 19 जुलै पासुन धरणातुन सुरु असलेला पाण्याचा विसर्ग धरणाचे पाचही दरवाजे बंद करून काल दुपारी एक वाजल्यापासुन बंद करण्यात आला आहे. 

धरण क्षेत्रात सुमारे 1 जुलै पासुन दमदार पावसाला सुरुवात झाली होती. कधी रिमझिम, कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस गत दीड महिन्यात काही दिवसांचा अपवाद वगळता सुरुच होता. धरणाने 85 टक्क्याची आकडेवारी पार केल्यावर धरण व्यवस्थापनाने पाणी साठा नियंत्रित करण्यासाठी 19 जुलैला धरणाचे पाच दरवाजे उघडुन सुमारे 2200 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु केला होता. पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर महिनाभर धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु होता. पावसाचा जोर ओसरल्याने तसेच धरण 100 टक्के भरण्यासाठी धरण व्यवस्थापनाने काल दुपारी एक वाजता धरणाचे पाचही दरवाजे बंद करुन विसर्ग थांबविण्यात आला.

तारळी धरण क्षेत्रात आज अखेर एकुण 1911 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 5.85 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या धरणात एकुण पाणीसाठा 5.22 टीएमसी झाला असुन 89 टक्के धरण भरले आहे. अजुनही 2558 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे.

Web Title: The five doors of the Tarli Dam are closed