सांगली कोरोना नियंत्रण कक्षातील पाच अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह 

विष्णू मोहिते
Saturday, 25 July 2020

सांगली, ः जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोरोना नियंत्रण कमांडर डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले. झेडपीच्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील 5 अधिकारी कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विभागाशी सबंधित अन्य 43 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रलंबीत आहेत. या अहवालाकडे सर्वाची नजर आहे. यामुळे झेडपी कार्यालय सोमवारपासून तीन दिवस बंद ठेवून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता झेडपी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी 27 ते 29 जुलै या कालावधीत जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहण्याची आवश्‍यकता नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी घरुनच आपल्या विभागाशी सबंधित शक्‍य ते कामकाज पार पाडावे, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी काढला आहे. सांगली जिल्हा परिषदेतील कोरोना नियंत्रण कक्षातील सहा अधिकारी-कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला. रोजावाडी येथील 51 वर्षीय माजी उपसरपंच आणि कामळवाडी येथील 57 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 44 वर पोहोचली. जिल्ह्यात नव्याने 166 रुग्ण आढळले असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 117 रुग्णांचा समावेश असून त्यामध्ये सांगलीत 74 तर मिरजेतील 43 रुग्णांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात अठरा, शिराळा तालुक्‍यात बारा, मिरज तालुक्‍यात चार, खानापूर व आटपाडी तालुक्‍यात प्रत्येकी एक, पलूस तालुक्‍यात पाच, जत आणि वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी तीन आणि तासगाव तालुक्‍यात दोन रुग्ण आढळले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five officers-staff of Sangli Corona Control Room tested positive