
सांगलीतील कार्यालया फोडले: चोरट्यांनी मारला लाखावर डल्ला
सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू ; लाखाची रोकड चोरीस
सांगली : शहरातील विजयनगर चौकात असलेल्या फाईव्ह स्टार फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 5 हजार 169 रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी गौसमुद्दीन सादीक बेगमपल्ली (वय 27, रा. रामरहिम कॉलनी, शिंदे मळा, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा- आता शेवटचे तीन दिवस बाकी,वातावरण अजून तापणार -
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
विजयनगर चौकात फाईव्ह स्टार फायनान्स लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कार्यालय बंद करून कर्मचारी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व टेबलच्या लॉकमध्ये ठेवलेली एक लाख 5 हजार 169 रुपयांची रोकड पळविली. काल सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
संपादन - अर्चना बनगे