esakal | पाच विद्यार्थी पकडले : कॉपीच कॉपी जिकडे तिकडे चोहीकडे 

बोलून बातमी शोधा

Five students were caught copying Shegaon

शेवगावमधील परीक्षा केंद्रांवर अनेक वर्षांपासून कॉपीबहाद्दरांचा धुमाकूळ सुरू आहे. तालुक्‍यातील अनेक उच्च माध्यमिक विद्यालयांत बारावीच्या वर्गात वर्षभर मुले उपस्थित नसतात.

पाच विद्यार्थी पकडले : कॉपीच कॉपी जिकडे तिकडे चोहीकडे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : बारावीच्या परीक्षेत भरारी पथकाने केलेल्या कारवाईत शेवगाव येथील दोन केंद्रांवर कॉपी करताना पाच विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर कॉपी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 


बारावीच्या परीक्षेत आज हिंदीचा पेपर सुरू होता. भरारी पथकाने शहरातील न्यू आर्टस महाविद्यालयातील केंद्रावर तीन जण व रेसिडेन्शिअल हायस्कूल केंद्रावर दोन जणांना कॉपी करताना पकडले. गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेवगावमधील परीक्षा केंद्रांवर अनेक वर्षांपासून कॉपीबहाद्दरांचा धुमाकूळ सुरू आहे. तालुक्‍यातील अनेक उच्च माध्यमिक विद्यालयांत बारावीच्या वर्गात वर्षभर मुले उपस्थित नसतात.

विविध खासगी क्‍लाससाठी ते नांदेड, औरंगाबाद, पुणे, लातूर येथे असतात. ही विद्यालये चालवण्यासाठी त्यांची बोगस हजेरी लावली जाते, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातीलही अनेक जण प्रवेश घेऊन थेट परीक्षेलाच येतात. त्यामुळे शाळेतील शिक्षक व कर्मचारी त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी परीक्षेच्या काळात झटताना दिसतात.

अनेक केंद्रावर असे विद्यार्थीपूरक चित्र दिसते. त्यामुळे भरारी पथकाच्या नजरेत ते का येत नाहीत, याचे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न अनेक पालक उपस्थित करतात.