esakal | सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली -  कोयना धरणातून आज सांयकाळी पाचच्या सुमारास 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग असाच पुढील दोन दिवस सुरू राहिल्यास सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सद्या 10 फूट 6 इंच असणारी पाणी पातळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चाैधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली -  कोयना धरणातून आज सांयकाळी पाचच्या सुमारास 73 हजार 63 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग असाच पुढील दोन दिवस सुरू राहिल्यास सांगली येथील आयर्विन पुलाजवळील सद्या 10 फूट 6 इंच असणारी पाणी पातळी 34 फूटावर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चाैधरी यांनी दिली आहे.

आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट आहे. पाणी नदी पात्रामध्येच रहाणार असले तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगून सतर्क रहावे व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी अलमट्टी धरणातून 1 लाख विसर्ग करण्याबाबत समन्वय ठेवण्यात आल्याचेही सांगितले.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी दिनांक 3 सप्टेंबर अखेर ग्रामीण भागातील 43 हजार 492 व शहरी भागातील 40 हजार 936 कुटूंबांना 42 कोटी 21 लाख 40 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 34 हजार 397 व शहरी भागातील 4490 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 21 कोटी 68 लाख 85 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटपाचे काम सर्व गावांत युध्दपातळीवर सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.

loading image
go to top