esakal | राज्य सरकारच्या धोरणावर सांगलीकर नाराज; जिल्ह्यासाठी हवेत 800 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

sangli Flood

राज्य सरकारच्या धोरणावर सांगलीकर नाराज; जिल्ह्यासाठी हवेत 800 कोटी

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे ८०० कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. जिल्हा प्रशासनाने सानुग्रह अनुदान ३० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. उर्वरीत शेतीसह घरे, झोपड्या, गोठे, बारा बलुतेदार कलाकार, शासकीय इमारतीस रस्ते नुकसानीसाठी ८०० कोटी रुपयांची गरज असून राज्य सरकारकडे निधीची मागणी प्रशासनाची केली आहे. मदतीसाठी विलंबाने राज्य सरकारच्या धोरणावर जनतेत नाराजीत भर पडते आहे.

जुलैमध्ये आलेल्या महापुरात घरे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सव्वा महिन्यांनंतरही मदत न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यांतील २४७ गावांतील आतापर्यंत १ लाख ५६५ शेतकऱ्यांच्या ३९ हजार ६९५ हेक्टर जमिनींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात जमिनीच्या भूस्खलनाच्या ५८१ हेक्टरमध्ये शिराळा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४४६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तीन इंचापेक्षा जादा माती, गाळ साचलेल्या जमिनीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. पूरग्रस्त ४२ हजार ३१९ कुटुंबांना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू आणि पाच किलो तुरडाळीचे ९५ टक्के कुटुंबांना वाटप पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: विधान परिषद निवडणूक जानेवारीत? काँग्रेस, BJP, JDS मध्ये चुरस

* चार तालुक्यांतील ११३ गावे बाधित

* ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे

* पूर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे ५२३ व पक्की घरे १७४

* अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे २९०० व पक्की घरे १३८४

* १९ झोपड्या, १५०० गोठ्यांचेही नुकसान

* १२१ लहान मोठी जनावरे व ४३ हजार ९४५ कुक्‍कुटपक्ष्यांचे पंचनामे

* ९४५ हस्तकला, हातमाग, बाराबलुतेदार

* १२ हजार ५८३ दुकानदार, ७ हजार २४२ टपरीधारक

* ४३ कोंबडीपालन शेडचे नुकसान

loading image
go to top