7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले

उसाच झालं चिपाड; शेतकरी सापडला आर्थिक कोंडीत
7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले
Updated on

कोकरूड : मिनी कोकण संबोधल्या जाणारा शिराळा पश्चिम भाग पावसाचे आगर आहे. मात्र महापुरामुळे सन २००५, २०१९ व त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात २०२१ मध्ये नदीकाठच्या शेतीला फटका बसला. सात महिने कष्टानं जपलेलं ऊस पीक सात दिवसात मातीमोल झालेले पहावे लागले. पूर ओसरल्याने नुकसानीचे भयावह चित्र स्पष्ट झाले आहे. या भागात सात दिवसात १२७४ मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

अतिवृष्टीसह धरणातून विसर्गामुळे वारणेने रौद्र रूप धारण केले. नदीकाठची हजारो एकर शेती पाण्यात बुडाली. ऊस, भात, सोयाबीनसह कुजली तर काही पिके वाहून गेली. ऊस पिक डोळ्यादेखत जमिनदोस्त झाले. शेतकऱ्याच्या तोंडचा घास पुराने हिरावून घेतला. बारमाही वारणेमुळे ऊस मोठया प्रमाणात केला जातो. डिसेंबर ते जानेवारीत उसाची लागण केली जाते. हुमणी, शेंड्यावर करपा, तर पानावर मावा यातून सावरलेला ऊस जमिनदोस्त झाला. पाणी उसाच्या सुरळीत जाऊन ऊसाचं चिपाड झालं.

7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले
'सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही'

अतिवृष्टीने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पुन्हा महापुराला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली. नदीकाठी एक किलोमीटर अंतरातील शेती पाण्याखाली जाऊन फटका बसला. राहती घरे व जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले. संसार उघड्यावर पडलेत. पिकांचे पंचनामे सुरु असून ऊस उत्पन्नात ५० टक्के घट होणार आहे. साखर कारखान्यांपुढे गाळपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे.

जमिनीत ऑक्सिजनची घट

शिराळा तालुक्यातील वारणानदी काठी असणारे ऊसाचे पीक ८० - ८५ टक्के नष्ट झाले आहे. ६-७ दिवस १०-१५ फूट पाणी उसात होते. पोंग्यात व सुरळीत पाणी, माती व गाळ जाऊन वाढे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खूप दिवस पाणी साचून राहिल्याने जमिनीतील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे पिकांची वाढ थांबणार आहे.

7 महिन्याच कष्ट 7 दिवसांत मातीमोल; सोयाबीन कुजले, पिक वाहून गेले
'हिंदूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतंय' - नितेश राणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com