राष्ट्रीय महामार्ग बंदला उलटले 36 तास

राजेंद्र हजारे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

निपाणी परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री रस्त्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला होता. होता छत्तीस तास उलटत आले तरीही अद्याप रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्पच आहे.

रस्त्यावर अजूनही पाणी : वाहतूक यंत्रणा ठप्पच
निपाणी - परिसरात पडणाऱ्या दमदार पाऊस आणि काळम्मावाडी कोयना आणि पाटगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निपाणी तालुक्यातील वेदगंगा दूधगंगा नद्यांना पूर वाढत आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगरणी येथील पुलाजवळ सोमवारी रात्री रस्त्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला होता. होता छत्तीस तास उलटत आले तरीही अद्याप रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्पच आहे.

परिणामी दळणवळण यंत्रणा विस्कळीत झाले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिस रात्रंदिवस महामार्गावर बॅरिकेट लावून पहारा देत आहेत. 

राष्ट्रीय महा मार्ग ठप्प होऊन दुसरा दिवस उजाडला तरीही रस्त्यारून वाहणारे पाणी कमी झालेले नाही. धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे मांगुर फाटा आणि यमगरणी येथे दोन ठिकाणी वाहने अडवून करण्यात आली आहेत.

त्यामुळे महामार्गाच्या कडेला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटन आणि इतर कामाच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या प्रवासावर मात्र रस्त्यावरच ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. यमगरणी परिसरात थांबलेल्या प्रवाशांना सरकारी शाळेतील गंजी केंद्रात निवारा व भोजनाची सोय करण्यात आली आहे. तर बेळगाव होऊन कोल्हापूरकडे जाणाऱ्या व पुराच्या पाण्यामुळे फसलेले अनेक प्रवासी शहरात अडकून पडले आहेत काही जणांनी नातेवाईक तर काहीजणांनी लॉज, हॉटेलचा आसरा घेतला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्यास आज सायंकाळपर्यंत महामार्ग खुला होण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे. आज दुसऱ्या दिवशीही शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न उरलेला नाही. तालुक्‍यातील सर्वच बंधाऱ्यावर पाणी आल्याने शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. 

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती जैसे थे असून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे एन डी आर या पथकाकडून गावागावात बचाव कार्य सुरू आहे. कोडणी, बुदिहाळ, यमगरणी, सिदनाळ, हुन्नरगी, जुने ममदापुर गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. त्यामुळे या गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावातील घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने त्या कोसळत आहेत. बुधवार सकाळी पर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. पूर परिस्थितीवर प्रशासकीय यंत्रणा नजर ठेवून असून पूरग्रस्त पर्यंत सर्व ती मदत पोहोचविली जात आहे. बर्‍याच गावात पुर आणि शेती वाडीत अडकलेल्या जनावरांच्या चारा पाण्याची सोय बोटीद्वारे केली जात आहे. आमदार शशिकला जोल्ले यांनी तालुक्‍यातीलपूरग्रस्त गावांना भेट देऊन सर्व अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Water Rain National Highway Close