Video : शिवाजी विद्यापीठ फुलांनी बहरले 

अर्चना बनगे
Sunday, 6 October 2019

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ परिसर सध्या वेगवेगळ्या फुलांनी बहरला आहे. अनेकजनांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. विद्यापीठ परीक्षेचा आणि जैव विविधता सध्या पहावयास मिळत आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ परिसर सध्या वेगवेगळ्या फुलांनी बहरला आहे. अनेकजनांचा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे. विद्यापीठ परीक्षेचा आणि जैव विविधता सध्या पहावयास मिळत आहे.

आठशे एकर परिसर असणाऱ्या या विद्यापीठात अनेक वेगवगळी झाडे, फुले,पक्षी वन्यजीव प्राणी आहेत.  अशातच शारदीय ऋतूमध्ये बहरलेली रानटी फुले,  फुलपाखरे आणि मध गोळा करणाऱ्या  मधमाशांनी विद्यापीठ परिसर  बहरून गेला आहे.

रानटी फुले, जास्वंद, कर्दळे, मेक्सिको, गुलाब आणि शोभेच्या फुलांनी विद्यापीठाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या फुलांमध्ये लाल ,गुलाबी, लव्हेंडर पिवळ्या रंगामुळे ही फुले लक्षवेधी ठरत आहेत. या फुलांमुळे विद्यापीठाला कास पठाराचे स्वरूप आले आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे.

याठिकाणी अनेक जातीच्या वनस्पतींना पोषक असे वातावरण आहे. त्यामुळेच रंगीबेरंगी फुलांच्या अनेक जाती या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. विद्यापीठात  नियमित फिरायला येणाऱ्यांची संख्या हजारोंनी असते.औषधीयुक्त वनस्पती असल्यामुळे याठिकाणी भरपूर ऑक्सिजन मिळतो. त्याचबरोबर आता फुलांचा सुगंध मनाला एक वेगळाच आनंद देत आहे.

विद्यापीठ परिसर फुलांनी बहरला आहे, सकाळचा रम्य परिसर आल्हाददायक असा असतो .येथील जैवविविधता आभ्यासाठी सुद्धा अनुकूल आहे.

- प्रणाली पाटील, विद्यार्थीनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowering bloom in Shivaji University