सांगली : ‘केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार हिप्परगी, आलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचे नियम काटेकोर पाळा. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीनशे गावे पुराच्या तडाख्यात सापडून वित्त आणि जीवित हानी टाळा,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राद्वारे केले आहे. कृष्णा नदीकाठावर उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्नाटक सरकारला सजग करण्याचा प्रयत्न या पत्रात केला आहे.