अन्नातून विषबाधा झालेल्या 'त्या' कुटुंबातील सदस्याचा मृत्यू

या घटनेमुळे गाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
dead
deadesakal
Updated on: 

खानापूर : मेजवणी आटोपून हुबळीहून घरी परतलेल्या बंकी (ता. खानापूर) येथील ११ जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापैकी तुषार महंमद जमादार (वय १३) या लहान मुलाचा उपचारा दरम्यान रक्तरी जिल्हा शासकीय इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

dead
मेजवानीतून परतलेल्या एकाच कुटुंबातील अकरा जणांना विषबाधा

बेकवाड ग्रा. प हद्दीत येणाऱ्या बंकी गावातील अब्दुल जमादार यांचे अकरा जणांचे कुटुंब मंगळवारी एम. के. हुबळी येथे पाहुण्यांकडे जेवणासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी परतले असता जेवून आलेल्यांच्या पोटात दुखू लागले. अत्यंत वेदना होऊ लागल्याने यातील त्याची पत्नी नावाजबी, मुले महमद, सारफराज, शयनज, नातवंडे शिबरन, साहि, सहना, जुहूर, आली, अजाण आदींची प्रकृती अत्यवस्थ झाली. दरम्यान, त्यांच्यावर नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री तुषार याची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णायालत दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नंदगड पोलिसांत याची नोंद झाली आहे. तालुका आरोग्यधिकारी डॉ. संजीव नांदरे इतर रुग्णांवर उपचार करत आहेत.

dead
जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com