जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील

जनता दलाने अधिकृत घोषणा केल्यानंतर पाठींब्यावर शिक्कामोर्तब झाले.

जनता दलामुळेच 'मॅजिक फिगर' ओलांडली - सतेज पाटील

sakal_logo
By
अजित मद्याळे

गडहिंग्लज : माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने पाठींबा जाहीर केल्याने माझ्या विजयासाठी आवश्यक २७० या 'मॅजिक फिगर'चा (magic figure) आकडा आज ओलांडला आहे. जनता दलाच्या नगरसेवकांनी दाखवलेला हा विश्‍वास सार्थ ठरवून गडहिंग्लजच्या विकासाला बळ देण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही विधानपरिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज येथे दिली. पालकमंत्री पाटील व अ‍ॅड. शिंदे यांच्या पहिल्या भेटीत पाठिंब्याविषयी सकारात्मक चर्चा झाली होती. आज जनता दलाने अधिकृत घोषणा केल्यानंतर पाठींब्यावर शिक्कामोर्तब झाले. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी स्वागत केले. (Kolhapur Politics)

स्वाती कोरी म्हणाल्या, जनता दलाचे १५ नगरसेवकांनी पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. गतवेळच्या निवडणुकीत काही कारणाने आम्ही पाटील यांच्यासोबत नव्हतो. यावेळी पाठीशी राहण्याचे ठरवल्याने पाटील यांनीही नगरपालिकेचे जे काही प्रश्‍न असतील त्या सोडवण्यासाठी भक्कमपणे साथ द्यावी आणि शहर विकासासाठी पाठबळ द्यावे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

पालकमंत्री पाटील म्हणाले, जनता दलाने आज एकमुखी पाठिंबा दिला आहे. यामुळे २७० चा आकडा पार केला आहे. शिंदे यांच्याशी पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. समाजकारण व राजकारणातील ते एक ऋषीतूल्य व्यक्तीमत्व आहेत. समाजकारणात सातत्याने वर्षानुवर्षे निस्वार्थीपणे त्यांनी काम केले आहे. शहराच्या विकासात पालिकेचे चांगल्या पद्धतीने पाऊल पडावे यासाठी प्रयत्न करु. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांचा विकास व्हावा हे माझे धोरण आहे. त्यासाठीचा आराखडाही तयार आहे. परंतु कोरोनामुळे दोन वर्षात हा आराखडा पुढे जावू शकला नाही. पालिका आणि नगरसेवकांच्या अडचणी सोडवण्यास नेहमीच सहकार्याची भूमिका राहील. जनता दलाने दाखवलेल्या विश्‍वासाला तडा जाणार नाही. विकासासाठी हातात हात घालून काम करु. यावेळी क्रांती शिवणे वगळता उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पाटील यांच्यासोबतचे प्रमुखकार्यकर्ते उपस्थित होते.

...तर पुतळा उभा करु

अ‍ॅड. शिंदे म्हणाले, शहराची हद्दवाढ झाली आहे. वाढीव हद्दीतील धबधबा, मेटाचा आणि दुंडगा मार्गातील ७५ टक्के जनता झोपडपट्टीत राहते. सद्यस्थितीत त्यांचे चांगल्या रहिवासात पुनर्वसन करणे आवश्यक आहे. हे काम सतेज पाटील यांच्या पुढाकाराने पूर्ण करु शकलो तर त्यांचा मस्तपैकी पुतळा उभा करु. शिंदे यांच्या या वक्तव्यावर पाटील यांच्यासह उपस्थितही हास्यात बुडाले. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी, याच प्रभागातून निवडून आलो असून तेथील जनतेचे प्रश्न गंभीर असल्याने प्रामुख्याने या दुर्गम भागाच्या विकासासाठी लक्ष घालण्याची अपेक्षा पाटील यांच्याकडे व्यक्त केली.

हेही वाचा: '3 पक्षाचे 3 मंत्री सकाळी येऊन सरकार खंबीर असल्याचं चेक करतात'

loading image
go to top