सांगली-मिरजेतील साडेचारशें जणांसाठी अन्नयज्ञ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सांगली : महापूराच्या आपत्तीपाठोपाठ आलेल्या कोरोनाच्या आपत्तीतही पुन्हा एकदा शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था मदतकार्यासाठी सरसावल्या आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील टी.बी.लुल्ला फौंडेशन, रॉबीनहुड आर्मी, तरंग बहुउद्देशीय संस्था आणि सत्कर्म फौंडेशन या संस्थांनी एकत्र येत गेले दहा दिवस सांगली-मिरजेतील सुमारे साडेचारशेंवर गरजूंना रात्रीच्या जेवणाची सोय केली आहे.

सांगली : महापूराच्या आपत्तीपाठोपाठ आलेल्या कोरोनाच्या आपत्तीतही पुन्हा एकदा शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था मदतकार्यासाठी सरसावल्या आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील टी.बी.लुल्ला फौंडेशन, रॉबीनहुड आर्मी, तरंग बहुउद्देशीय संस्था आणि सत्कर्म फौंडेशन या संस्थांनी एकत्र येत गेले दहा दिवस सांगली-मिरजेतील सुमारे साडेचारशेंवर गरजूंना रात्रीच्या जेवणाची सोय केली आहे.

हे वाचा-राज्यातील पंधराशे माजी आमदार कोरोनाच्या उपाययोजनांसाठी देणार महिन्याची पेन्शन...

गेल्या 28 मार्चपासून शहरातील हजारो बेघर-भटके तसेच कष्टकरी कुटुंबावर पोटापाण्याचीच अडचण उभी राहिली. ही गरज ओळखत या संस्थांनी एकत्र येत मदतकार्याला सुरवात केली. आधीपासूनच शहरातील रॉबीनहुड आर्मी ही संस्था हॉटेल्स, मंगल कार्यालये, घरांमधून शिल्लक अन्न संकलित करून ते गरजू भटके भिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करते. त्यामुळे त्यांना नेमकी गरज कोठे याची आधीपासूनच माहिती होती. त्यामुळे या संघटनेचे रोहन कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेत या संस्थांनी मदत कार्याला सुरवात केली.

हे वाचा-जोतिबा चैत्र यात्रा भाविकाविनाच ; डोंगर पडला

त्यांच्या मदतीला भारती विद्यापीठातील डॉ.वैभव माने व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. मिरजेतील गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजवळ सेंट्रल किचन सुरु केले आहे. तिथून सध्या रोज सायंकाळी पाचनंतर सुरु असलेला अन्नवाटपचा यज्ञ रात्री बारापर्यंत सुरु असतो. सध्या मिरजेत मिरज हायस्कुल-125, ख्वॉजा वसाहत-70, समतानगर 50, कृपामयीजवळ 70, अंबाबाई संस्थेच्या वसतीगृहाजवळ 70, सांगलीत हनुमाननगर 120, आबा धोत्रे झोपडपट्टी 35 या ठिकाणांवरील सुमारे साडेचारशेंवर लोकांना अन्नपुरवठा सुरु आहे.

"" आम्हाला तातडीने मास्क, सॅनिटायझर्स आणि हातमोजे अशा साहित्याची गरज आहे. याशिवाय भाजीपाला-धान्याच्या स्वरुपातही मदत हवी आहे.''
मयुरेश अभ्यंकर

"" आम्ही दोन लाख रुपयांची प्राथमिक मदत आत्तापर्यंत दिली आहे. पुढील तीन महिने काही गरीब गरजू कुुटुंबांना आम्ही शिधा पॅकिंग करून देणार असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी थेट निधीच्या स्वरुपात लुल्ला फौंडेशनकडे मदत सोपवावी.''
किशोर लुल्ला

 

रॉबीनहुडची टीम
रॉबीनहुड आर्मीचे रोहन कोठारी (वय 28) वैभव पाटील (24), साहिल शेख (28), प्राप्ती शहा (22), सौरभ दुर्गाडे (21), सागर साळुंखे (24), प्रमोद जाधव (24), अखिल मरफानी (23), मिहिर सांगवेकर (21) अशी टीम रात्री बारापर्यंत अन्न वाटपाची आघाडी सांभाळत आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foodgrains for four and a half people in Sangli-Miraj