नगरमध्ये भरला मूर्खांचा बाजार, बघा व्हिडिअो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेतलेला असताना नगरमध्ये त्याला हरताळ फासला जात आहे.

नगर ः पुण्या-मुंबईसह राज्यात संचारबंदी लागू केली आहे. लोकांना अनेक अडचणी सामना करावा लागत आहे. कोणाची हातावरची पोटं आहेत. परंतु कोरोनासारख्या महामारीपासून वाचण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेतलेला असताना नगरमध्ये त्याला हरताळ फासला जात आहे. नगर तालुका मार्केट कमिटीच्या आवारात आज पहाटेपासूनच हा बाजार भरला होता. किमान दोन ते तीन हजार लोक या बाजारात होते.

काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली. परंतु कोणीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे उशिरापर्यंत हा बाजार सुरू होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरल्याने काही लोक उपहासाने म्हणत आहेत. नगरकरांना कितीही सांगा ते रस्त्यावर येऊन गर्दी करीत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांच्याही जीवाला अपाय होत आहे. हा केवळ बाजार नाही तर मूर्खांचा बाजार आहे.

संचारबंदी तसेच लॉकडाऊनच्या निर्णयातून आदेशातून भाजीपाला, दूध, किराणा सामान, मेडिकल दुकान यांना वगळण्यात आलं आहे. जागोजागी ही दुकानं सुरूही आहेत. केवळ स्वस्तात भाजीपाला मिळतो म्हणून लोक भाजी मंडईत जाऊन खरेदी करीत आहेत.या मार्केटमुळे सर्वांवरच महामारी येऊ शकते, अशी भीतीही जाणकार व्यक्त करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A foolish market in Ahmednagar