
कोल्हापूरात या कॅट शोच्या निमित्ताने मांजराच्या आरोग्याविषयी सर्वांना माहिती देण्यात येणार आहे.
देशभरातील मांजरे पाहायची आहेत..? या कोल्हापुरात....
कोल्हापूर : ज्या प्राण्याची व माणसाची लहानपणीच जवळीक निर्माण होते, तो प्राणी म्हणजे मांजर. अतिशय माणसाळलेल्या आणि घराघरात असणाऱ्या या मांजरांची रूपेही वेगवेगळी आहेत आणि देशभरातील विविध प्रांतांत असलेल्या या पाळीव मांजराची विविध रूपे कोल्हापूरकरांना १९ जानेवारी रोजी पाहावयास मिळणार आहेत. निमित्त आहे, राष्ट्रीय कॅट शोचे. फेलाईन क्लब ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने असा कॅट शो कोल्हापुरात प्रथमच भरत आहे. जसे कुत्र्याच्या शौकिनांनी आपापल्या कुत्र्यांचे रेकॉर्ड ठेवले आहे, तशाच प्रकारे या मांजरांचीही फेलाईन क्लबकडे नोंदणी झाली आहे.
हेही वाचा - सावधान ! थकबाकीसाठी हा टॉवर होणार सील... -
मांजराच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन
महाराजा बॅंकवेट लोणार वसाहत, रेल्वे लाईन जवळ येथे सकाळी आठ ते, सायंकाळी सात वाजेपर्यंत हा कॅट शो चालणार आहे. यासाठी गोवा, आंध्र प्रदेश, मुंबई , पुणे बेळगाव मैसूर बंगळूर येथून देशी व विदेशी प्रजातीची १०० हून अधिक मांजरांचा समावेश असणार आहे. मांजर घराघरात असले तरीही मांजराची निगा त्याचे आरोग्य, लसीकरण, आहार याची या कॅट शोच्या निमित्ताने सर्वांना माहिती देण्यात येणार आहे. देशी व विदेशी अशा दोन विभागात व परदेशी मांजरांच्या विविध जात निहाय निकषावर ही स्पर्धा होणार आहे. त्यात देशी मांजरात ‘बेस्ट माऊ‘ या पुरस्काराने एका मांजराला सन्मानित करण्यात येणार आहे. याठिकाणी नागरिक आपले मांजर घेऊन आल्यास त्याचे लसीकरण ही केले जाणार आहे .
क्लिक करा -सांगलीचा दशरथ झाला लखपती... -
परदेशातील परीक्षक
या कॅट शो साठी×लन रेमंड व मायकेल डग्लस .( ऑस्ट्रेलिया) हे दोन परदेशी तज्ञ परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.