
शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथील रामचंद्र नामदेव नाकील यांच्या विहिरीत सापडलेली मगर वन विभागाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिली. घटनास्थळ व वन विभागातून समजलेली माहिती अशी : सागाव-नाटोली रस्त्याशेजारी सागाव येथील रामचंद्र नामदेव नाकील यांची विहीर आहे. विहिरीत तीन फूट लांबीची मगर असल्याची माहिती वन विभागास मिळाली.