Lockdown : अखेर बिबट्याचा बछडा विसावला आईच्या कवेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी श्री. काळे, वन रक्षक अशोक मलप, रमेश जाधव, दादाराव बर्गे, योगेश पाटील, अमोल महाडिक योगेश बडेकर, प्राणी मित्र रोहित कुलकर्णी यांनी बछडा व मादीच्या भेटीसाठी रात्र जागून काढली. मादीने बछड्याला नेल्यावर संबंधितांना सुटकेचा निःश्वास टाकला.

तांबवे ः सुपने येथील माळी मळा नावाच्या शिवारात उसाच्या शेतामध्ये काल दुपारी बिबट्याचा बछडा आईपासून फसून शिवारात वावरत होता. त्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने संबंधित बछड्याच्या भोवती उसाचा पिंजरा करून मादीची प्रतीक्षा केली. रात्री उशिरा मादीने बछड्याला कवेत घेऊन धूम ठोकली. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे श्रम सत्कारणी लागले.
 
सुपने, पश्‍चिम सुपनेसह त्या परिसरातील जोमलिंग परिसरातील शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्याने यापूर्वी पाळीव प्राण्यांवर हल्लेही केले आहेत. त्याचे अनेक शेतकरी, ग्रामस्थांनाही त्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण होते. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. काल दुपारी माळी मळा नावाच्या शिवारात बिबट्या दिसल्याची माहिती अक्षय माळी यांनी वन विभागाचे म्होप्रेतील वनरक्षक अशोक मलप यांना दिली. त्यांनी तातडीने वनमजूर घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विलास काळे यांना दिली. त्यानंतर श्री. काळे संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दरम्यान कर्मचाऱ्यांनी टोमॅटोच्या शेतात ट्रॅप करून बछड्याला ठेवले.

दरम्यानच्या काळात कोल्हापूरच्या रेस्क्‍यू पथकालाही वन अधिकारी काळे यांनी बोलावले. सायंकाळी रेस्क्‍यू पथकातील डॉ. संतोष वाळवेकर हे त्यांच्या पथकासह दाखल झाले. संबंधित ठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्याचे सेटिंग सुरू असतानाच बिबट्याच्या मादीने संबंधित ठिकाणावरून बछड्याला कवेत घेऊन उसाच्या शिवारात धूम ठोकली. त्यानंतर रेस्क्‍यू पथकाने बिबट्याच्या पंजांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी श्री. काळे, वन रक्षक अशोक मलप, रमेश जाधव, दादाराव बर्गे, योगेश पाटील, अमोल महाडिक योगेश बडेकर, प्राणी मित्र रोहित कुलकर्णी यांनी बछडा व मादीच्या भेटीसाठी रात्र जागून काढली. मादीने बछड्याला नेल्यावर संबंधितांना सुटकेचा निःश्वास टाकला. 

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

Lockdown : अडीच हजार रिक्षाचालक अडचणीत; चालकांसह त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department Saved Lepoard In Satara District