वनात जमवले घबाड, खराब झालं रेकॉर्ड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

नगर येथे सामाजिक वनिकरण विभागात प्रादेशिक लागवड अधिकारी असताना सन 2000 ते 2005 या कालावधीत सुमारे 55 टक्के ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पारनेर : सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असताना वृक्षलागवडीऐवजी दुसरीच लागवड केली. पंधरा वर्षांपूर्वी केलेला हा "प्रताप' उघड झाला आहे. नगर येथे सामाजिक वनिकरण विभागात प्रादेशिक लागवड अधिकारी असताना सन 2000 ते 2005 या कालावधीत सुमारे 55 टक्के ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच कारणातून केशव रभाजी फंड व त्यांची पत्नी सविता यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 

जाणून घ्या-"उद्धव' यांनी घातली रोहित पवारांच्या हातून चप्पल 
 

घरी टाकला छापा 
आज (ता. 23 ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी सुपे (ता. पारनेर) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून ही कारवाई केली. या बाबत माहिती अशी की, आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुपे येथे फंड यांच्या राहात्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्यांनी अपसंपदा जमविल्याच्या कारणातून चौकशी सुरू केली आहे. त्यांनी सन 2000 मध्ये एक लाख 39 हजार 956 रूपये उत्पनाचे 24 टक्के, सन 2003 मध्ये 15 हजार 896 उत्पन्न रूपयांच्या चार टक्के, सन 2005 मध्ये दोन लाख 91 हजार 231 रूपये उत्पन्नाच्या 55 टक्के अशी एकूण चार लाख 47 हजार 83 रूपयेवरील वर्षाच्या उत्पनाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिकची अपसंपदा संपादित केली. 

या कलमांचा घेतला आधार 
याच कारणातून केशव फंड यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन 2018 ) चे कलम 13(1)(ब) व पत्नी सविता यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 (संशोधन 2018 ) चे कलम 12 प्रमाणे सकृत दर्शनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे यांनी सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest officer against fir