कोरोनाव्हायरस ः माजी मंत्री राम शिंदेंची उडाली झोप

वसंत सानप
Thursday, 23 April 2020

जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आली. मात्र, रात्री मला समजले जामखेडमध्ये आणखी दोन रुग्णाची वाढ झाली. आता जामखेडमधील एकुण संख्या अकरा झाली आहे. ( ९+२ विदेशी) हे ऐकुन माझे मन खुप सुन्न झाले.

जामखेड : बारामती येथे एक रुग्ण आढळुन आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रूग्णांची संख्या पुर्णपणे नियंत्रणात आणली. त्याप्रमाणे जामखेड मध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे .तरी शासनाने व प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी, असे ट्विट माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.

शिंदे यांनी ट्विट केलेला आशय असा, नगर जिल्ह्यात कोरोना महामारी लॉक डाऊन सुरु होऊन काल एक महिना पुर्ण झाला संपुर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकार ने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचना चे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठीसाठी कसोशीने प्रयत्न केले, रुग्णाची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले पण जामखेड, नगर शहर,संगमनेर नेवासा इत्यादी ठिकाणी अधिकचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणुन जाहीर केले.

हेही वाचा - मरकजसाठी आलेल्या चार नेपाळींना कोरोनाची लागण

जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आली. मात्र, रात्री मला समजले जामखेडमध्ये आणखी दोन रुग्णाची वाढ झाली. आता जामखेडमधील एकुण संख्या अकरा झाली आहे. ( ९+२ विदेशी) हे ऐकुन माझे मन खुप सुन्न झाले. रात्रभर झोप आली नाही.
ज्याप्रमाणे बारामती येथे एक रुग्ण आढळुन आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रूग्णांची संख्या पुर्णपणे नियंत्रणात आणली. त्याप्रमाणे जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे. शासनाने व प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी ही विनंती. जिल्ह्यातील संपुर्ण प्रशासन विशेष करून जिल्हाधिकारी, अधिकारी, डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी इत्यादी देवदुतांचे मनापासुन आभार मानतो वंदन करतो .
तसेच जिल्ह्यातील सर्व जनता चांगले सहकार्य करीत आहे. यापुढे देखील प्रशासनला सहकार्य करावे",असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former minister Ram Shinde fell asleep