मरकजसाठी आलेल्या चार नेपाळींना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या ३७ झाली आहे. त्यातील २०जणांना पूर्ण बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण दुबईहून आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर आणखी दोन रूग्ण सापडले. ​

नगर - जामखेड पाठोपाठ आता संगमनेरमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. काल रात्री उशिरा जामखेड शहरातील दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यात आता संगमनेरमधील तब्बल चारजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या ३७ झाली आहे. त्यातील २०जणांना पूर्ण बरे झाल्याने डिस्चार्ज दिला आहे. जिल्ह्यात पहिला रूग्ण दुबईहून आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर आणखी दोन रूग्ण सापडले. मात्र, जामखेडच्या मशिदीत लपून बसलेल्या तीन परदेशी नागरिकांना पकडून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचा सिलसिला सुरूच राहिला.

दोन दिवसांत सहा रूग्ण वाढले आहेत. जामखेडचा लॉकडाउन सहा तारखेपर्यंत करण्यात आला आहे. तेथील एका कॉलनीतीलच रूग्ण सापडत आहेत. आतापर्यंत तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या दोन मुलांनाही बाधा झाली आहे.

दिल्लीतील मरकजनंतर नेपाळी नागरिक संगमनेरला आले होते. ते एका मशिदीत राहत होते. मात्र, जामखेडमध्ये मशिदीत आसरा घेतलेल्या नागरिकांना पकडल्यानंतर ते जागे झाले. त्यांनी एका फ्लॅटमध्ये आसरा घेतला. त्या प्रकरणी मशिदीच्या ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या चौदा नागरिकांपैकी हे चारजण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangamner again four coronated