esakal | Ramesh Jarkiholi CD Case: युवतीच्या जबाबाने सीडी प्रकरणाला आता वेगळे वळण 

बोलून बातमी शोधा

Former Minister Ramesh Jarkiholi Offensive CD Case political marathi news

युवतीने आपला जबाब बदलला नसल्याचे सांगून युवतीचे वकील सूर्य मुकुंद राज यांनी युवती आपल्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

Ramesh Jarkiholi CD Case: युवतीच्या जबाबाने सीडी प्रकरणाला आता वेगळे वळण 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी आक्षेपार्ह सीडी प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. प्रकरणातील पीडित युवतीने, पत्रकार नरेश गौडा आणि श्रवण यांनी आपला हनिट्रॅपसाठी वापर केल्याचा आरोप केला आहे.

यापूर्वी न्यायाधीशांसमोर हजर राहून सीआरपीसी १६१ अंतर्गत तिने जबाब दिला होता. यावेळी तिने आपणास नोकरी देण्याचे आश्वासन देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळींवर केला होता. त्यानंतर काही दिवसांतच युवतीने यू टर्न घेतला. आपण दबावाखाली येऊन अशाप्रकारचे वक्तव्य केल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणातील किंग पिन म्हणून ओळखले जाणारे नरेश गौडा आणि श्रवण यांनी हनिट्रॅपसाठी आपला वापर केल्याचा जबाब एसआयटीसमोर युवतीने दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात आपण केलेले वक्तव्य पूर्ण सत्य नसल्याचे तिने एसआयटीसमोर सांगितले. त्यामुळे तिच्या वक्तव्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सीआरपीसी १६१ अंतर्गत पीडित महिलेने दिलेल्या जबाबाने एसआयटीचे अधिकारी गोंधळले होते. एसआयटीने युवतीच्या विधानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. आता युवतीचा आणखी एका न्यायाधीशांसमोर सीआरपीसी १६४ अंतर्गत जबाब नोंद करण्याची तयारी एसआयटी अधिकारी करत आहेत. यापूर्वी न्यायाधीशांसमोर हजर होऊन जबाब दिल्यानंतर एसआयटी अधिकारी कविता यांनी तिची चौकशी केली आणि तिची माहिती गोळा केली, पण आता या युवतीने सूर बदलला आहे. याबाबतचे वृत्त काही कन्नड माध्यमांच्या वेबसाईवटरून प्रसिद्ध झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे.

जबाब बदलला नसल्याचे स्पष्टीकरण
युवतीने आपला जबाब बदलला नसल्याचे सांगून युवतीचे वकील सूर्य मुकुंद राज यांनी युवती आपल्या मतावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. आरोपींसोबत झालेल्या बोलण्याचे पुरावे तिने एसआयटी अधिकाऱ्यांना सादर केले आहेत. कोणत्याही प्रकारे वेगळा जबाब दिलेला नाही. या संबंधी सर्वजण एप्रिल फूल झाल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

संपादन-अर्चना बनगे