दुष्काळ जाहीर करण्यासाठी भीक मागावी लागते : माने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

सोलापूर : यंदा पाऊस कमी पडला आहे, हे वास्तव आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागतात, शासनाकडे भीक मागावे लागतेय अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष असल्याचे मत सोलापूर बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले.

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मंडळात उत्तर सोलापूर तालुक्‍यातील महसूल मंडळ वगळण्यात आले आहे. या मंडळांचाही दुष्काळात समावेश करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळिराम साठे उपस्थित होते. साठे म्हणाले, यापूर्वीही राज्यात वारंवार दुष्काळ पडला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने दुष्काळग्रस्तांना सढळ हाताने मदत केली. आताचे सरकार कर्जमाफी, हमीभाव यासह इतर मुद्यांवर शेतकऱ्यांवर वेठीस धरत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former MLA Mane criticize bjp government