Uniform Civil Code : 'देशात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर, समान नागरी कायदा लागू करा'; माजी आमदाराची मागणी

हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्यविक्री व मांसविक्रीला बंदी घाला.
Former MLA Nitin Shinde
Former MLA Nitin Shindeesakal
Summary

देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे, ही मागणी हिंदू एकता आंदोलन १९८० पासून करत आहे.

सांगली : देशात व राज्यात हिंदुत्ववादी विचारधारेचे सरकार सत्तेवर असून समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) हा कायदा होण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी एकत्रित येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.

Former MLA Nitin Shinde
Raju Shetti : 'मी आता स्वस्थ बसणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा तो कार्यक्रम उधळणार'; राजू शेट्टींनी का दिला इशारा?

आळंदी येथील कर्मयोगी भगवान महाराज कोकरे यांचे आठ ते नऊ दिवस सुरू असलेल्या बेमुदत उपोषणास हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी भेट दिली. हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्यविक्री व मांसविक्रीला बंदी घाला, शालेय शिक्षणामध्ये असलेला मुघलांचा इतिहास काढून टाका आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा विस्तृत इतिहास समावेश करा.

Former MLA Nitin Shinde
Deepak Kesarkar : मंत्री केसरकर खरंच आमदारकी सोडून खासदारकी लढवणार? स्वत:च केला 'या' मतदारसंघावर दावा!

आळंदीतील इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ करा आदी मागण्यांसाठी माजी आमदार नितीन शिंदे यांनी हिंदू एकता आंदोलनतर्फे पाठिंबा जाहीर दिला. ते म्हणाले, देशात समान नागरी कायदा झालाच पाहिजे, ही मागणी हिंदू एकता आंदोलन १९८० पासून करत आहे. भगवान महाराज कोकरे यांनी ‘हिंदू एकता’च्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com