उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंगे बंद करा, अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता हिंदू एकता आंदोलन संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.
सांगली : मशिदीवरील भोंगे बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ‘हिंदू एकता आंदोलन’तर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येणार आहे. आज सोमवारी (ता. ३) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी दिली.