esakal | माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

माजी आमदार संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : रात्रीच्या वेळी बॅनर लावायची कामे मराठी माणसे करतात असे सांगत मराठी भाषिकांवर आगपाखड करणाऱ्या माजी आमदार संजय पाटील यांच्या विधानाबाबत मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मराठी माणसे रात्रीचे वेळी बॅनर लावण्याचे काम करतात असे सांगणाऱ्या संजय पाटील यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री आले त्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते रात्रीच्या वेळी काय करत होते असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी राकसकोप रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे पडले होते. त्याबाबत काही जणांनी बॅनर लावले होते त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये खड्ड्यांचे श्रेय घेण्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना संजय पाटील यांनी मराठी भाषिकांवर आग पाखड करताना रात्रीचे बॅनर लावण्याचे काम भाजप नाही तर मराठी भाषीक करतात असा आरोप केला त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून मराठी भाषिकांमधून त्यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दात समाचार घेतला जात आहे.

राष्ट्रीय पक्षाचा एखादा नेता येणार असल्यास कार्यकर्ते रात्रीच्या वेळी ध्वज व फलक लावताना दिसतात. त्यावेळी मात्र भाजपचे नेते अशा प्रकारची बेताल वक्तव्य करीत नाहीत अशा प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी माजी आमदार अशा प्रकारची वायफळ बडबड नेहमीच करीत असतात. मराठी भाषिकांची मते पाहिजेत पण मराठी भाषिक नकोत अशी परिस्थिती राजकीय पक्षांची आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी वेळीच शहाणे झाले पाहिजे.

मनोहर किणेकर, माजी आमदार

काँग्रेस व भाजपच्या भांडणात मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र येणाऱ्या काळात मराठी भाषिक आपली ताकद राष्ट्रीय पक्षांना दाखवून देतील.

संतोष मंडलिक, अध्यक्ष तालूका युवा आघाडी

loading image
go to top