"सत्ताधाऱ्यांना राजकारण करण्यासाठी त्यातून पैसे बाजूला काढायचे आहेत. या महामार्गात सरकार पैसे घालणार नाही, तर खासगी भांडवलातून काम होणार आहे."
इस्लामपूर : ‘‘राज्य शासनाने कोणाचीही मागणी नसताना घाट घातलेल्या शक्तिपीठ महामार्गामुळे (Shaktipeeth Highway) सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांची मोठी लूट होणार आहे. या महामार्गामागे ५० हजार कोटी रुपयांचे गौडबंगाल दडले आहे,’’ अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे केली. काहीही झाले तरी हा महामार्ग (Shaktipeeth Highway) होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.