
आरग : बेडग (ता. मिरज) ग्रामपंचायतीत एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या ८ महिन्यांत बाजार करात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. तत्कालीन सरपंच रुपाली शिंदे व ग्रामसेवक एम. पी. कांबळे व बी. एल. पाटील यांच्याकडून ४७ हजार ५९२ रुपये अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिलेत.